Breaking News

जीबीएस प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाच्या घरी आ.सचिन पाटील यांची भेट

Visit of A. Sachin Patil at the home of a GBS infected patient

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१३ - मा.खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आ.सचिन पाटील यांनी जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या आसू येथील विराज सतीश पवार वय १३, याच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांना आधार दिला. तसेच आसू गावातील पशुवैधकीय केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच गावातील गटार, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था, स्वच्छता तसेच ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कामाची पाहणी केली.

    ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी व पशुवैद्याधिकारी यांचेकडून कामात हलगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनात आले असता याची गंभीर दखल घेऊन, त्यांना कामात कुसूर करू नये व नागरिकांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा अश्या शब्दात दखल घेऊन त्यांना यापुढे नागरिकांची तक्रारीवर त्वरित निरसन करण्यासंबंधी सूचना केल्या,  आजार पसरू नये याबाबत काळजी घेण्यात यावी अशा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुंभार साहेब, तालुका आरोग्य अधिकारी दिघे साहेब, भाजप तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, युवा नेते विशाल माने आसू गावचे ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments