यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण येथे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण केंद्र क्रमांक 1002 येथे आज पासून सुरू होत असलेल्या फेब्रुवारी- मार्च 2025 इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेकरता प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसमवेत कॉपीमुक्त अभियान उपक्रमाची शपथ घेण्यात आली.
त्यानंतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत केंद्र संचालिका सौ. सुरवसे व्ही. के.,उपकेंद्र संचालिका सौ भागवत एस. एम. व उपकेंद्र संचालक श्री अजय वाघमारे सर, प्रशालेचे प्राचार्य मा.श्री.थोरात एस बी, उपप्राचार्य मा श्री. घनवट पी. डी. यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेकरिता शुभेच्छा देऊन परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त, तणाव विरहित व आनंदी वातावरणात ही परीक्षा विद्यार्थ्यांनी द्यावी असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व सौ वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मधील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments