सोळशी धरणातून पाणी मिळण्यासाठी श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्वाखाली उत्तर कोरेगावातील १८ गावे एकवटली
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.९ - महाबळेश्वर तालुक्यात नव्याने होत असलेल्या सोळशी धरणातून कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील दुष्काळी गावांना पाणी मिळावे, अशी मागणी सोळशी येथे एकमुखाने करण्यात आली. यासंदर्भात आज उत्तर कोरेगावातील १८ गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. सोळशी धरण पाणीवाटप संघर्ष समितीची स्थापना यावेळी करण्यात आली. या समितीचे नेतृत्व विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी करावे, असा ठरावही करण्यात आला.
महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी खोऱ्यात साडेपाच टीएमसी क्षमतेचे सोळशी धरण होत आहे. या धरणातून पाणी बोगद्याद्वारे धोम धरणात सोडावे आणि तेथून ते पाणी कोरेगावच्या उत्तर भागाला देण्यात यावे, अशी लोकांची मागणी आहे.
आमदार श्रीमंत रामराजे एका कार्यक्रमासाठी सोळशी (ता. कोरेगाव) येथे आले होते. त्या वेळी त्यांच्या उपस्थितीत आज यावर चर्चा करण्यात आली. या अधिवेशनाच्या काळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री विखे पाटील यांना भेटून निवेदन देण्याचे ठरले. कोरेगाव तालुक्याप्रमाणेच वाई, माण, खटाव येथील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी संघर्ष समिती स्थापन करावी, असेही आवाहन यावेळी श्रीमंत रामराजेंनी केले.
यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती नागेश जाधव, माजी उपसभापती संजय साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश धुमाळ, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष लालासाहेब शिंदे, जितेंद्र जगताप, संग्राम सोळसकर, विकास यादव, प्रवीण सोळसकर, विशाल सोळसकर, नंदकुमार यादव, मोहन सोळसकर, महादेवशास्त्री यादव, तानाजी सोळसकर, देवाप्पा यादव, जनार्दन यादव, भानुदास यादव, निखिल गोळे, नितीन साळुंखे, प्रशांत यादव, औदुंबर यादव, विकास साळुंखे, भूषण पवार, संभाजी धुमाळ, विशाल शिंगटे, प्रमोद धुमाळ, दत्तात्रय भोईटे आदींसह उत्तर कोरेगावमधील शेतकरी उपस्थित होते.
No comments