Breaking News

कत्तलीसाठी चालवलेली २ गोवंशी जनावरे पकडली ; ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

2 cows being driven for slaughter caught; goods worth Rs 3 lakh 55 thousand seized

    फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - फलटण गारपीरवाडी, चौधरवाडी तालुका फलटण येथे पांढऱ्या रंगाचा महिंद्रा बोलेरो पिकअप या वाहनात दोन खिलार जातीच्या गाई कत्तल करण्याच्या उद्देशाने, चारापाण्याची सोय न करता विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 2 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक 20/03/2025 रोजी रात्रौ 12.15 वा चे सुमारास हणुमान मंदिर, गारपिरवाडी, पोस्ट चौधरवाडी, ता.फलटण, जि.सातारा येथे एक पांढऱ्या रंगाचा महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक  MH- 11 , BL-4079 मध्ये 20,000 किंमतीची  उभी शिंगे असलेली पांढरे रंगाची देशी (खिलार) जातीची गाय तिचे अंदाजे वय  4 वर्षे व 10,000 रुपये किंमतीची एक उभी शिंगे असलेली पांढरे रंगाची देशी (खिलार) जातीची गाय तिचे अंदाजे  वय  दिड वर्षे चालक नामे - गणेश शिवाजी भिवरकर रा.अलगुडेवाडी, ता.फलटण, जि.सातारा व सलीम हाजी शेख,  मुळ रा. सरडे, ता.फलटण, जि.सातारा, सध्या रा.अलगुडेवाडी यांनी सदर महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनामध्ये जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने चारापाण्याची सोय न करता विनापरवाना जनावरे वाहतुक करत असताना मिळुन आले.

    याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करत, दोन्ही गाईंसह चारचाकी वाहन असे एकूण २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार फाळके या करीत आहेत.

No comments