समय संस्थेच्या वतीने राजवडी येथे निराधार महिलांची बैठक संपन्न
दहिवडी (गंधवार्ता वृतसेवा) - शासन आधार असणाऱ्या सक्षम महिलांसाठी लाडकी बहीण योजनेसारख्या विविध योजना राबवित आहे. परंतु निराधार महिलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. यासाठी समय संस्था निराधार महिलांच्या प्रश्नावर काम करीत आहे.
त्यांची सामाजिक सुरक्षितता,उपजिवीका, मुलांचे संगोपन,इत्यादी अनेक प्रश्न आहेत, हे समजून घेण्यासाठी गावोगावी निराधार महिलांच्या बैठका संस्थेच्या वतीने घेण्यात येत असून, त्याचाच भाग म्हणून राजवडी या ठिकाणी बैठक घेण्यात आली व त्यांना शासनाच्या संजय गांधी योजना,श्रावणबाळ योजना ,बालसंगोपन योजना यांची माहिती देण्यात आली. मात्र योजना मिळविण्यासाठी गावपातळीवरील अधिकारी सहकार्य करीत नाहीत अशी खंत महिलांनी व्यक्त केली.
बैठकीस संस्थेच्या सचिव भारती पवार यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस पत्रकार महेंद्र भोसले,माजी सरपंच पोपट गोरवे,दादासाहेब भोसले सर,रुक्मिणी गेजगे ,संस्थेच्या राणी पवार उपस्थित होते.
No comments