Breaking News

फलटण उपविभागीय अधिकारी पदी श्रीमती प्रियंका आंबेकर यांची नियुक्ती

Appointment of Mrs. Priyanka Ambekar as Phaltan Sub-Divisional Officer

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. १० मार्च - फलटण उपविभागीय अधिकारी पदी श्रीमती प्रियंका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी फलटण प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या बदली नंतर विकास व्यवहारे पर्यवेक्षित उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहत होते, आता सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे उपविभागीय अधिकारी पदी कार्यरत असलेल्या सौ. प्रियंका आंबेकर यांची फलटण उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments