मुधोजी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास अर्जुन पुरस्कार प्राप्त ललिता बाबर यांची उपस्थिती
फलटण - फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ गुरुवार दिनांक १३ मार्च रोजी सकाळी १० वाजता असून, सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू सौ. ललिता बाबर भोसले या उपस्थित राहणार आहेत. तसेच अध्यक्ष म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सचिव फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण तर प्रमुख उपस्थिती मध्ये श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत.
प्रस्तुत कार्यक्रमास फलटण एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य,सर्व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी, यशवंत खेळाडू, अव्वल कलाकार यांना अतिथींच्या हस्ते पारितोषिक व ट्रॉफीज तसेच विविध पैशाच्या स्वरूपातील पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या उत्तुंग कामगिरीचा गुणगौरव करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करताना नामांकित अतिथींना पाचारण केले जाते, तरी याप्रसंगी सर्व हितचिंतकांनी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या गुणगौरव समारंभ समिती व प्राचार्य मुधोजी महाविद्यालय यांच्या वतीने करण्यात येत आहे.
No comments