महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने फलटण येथे निदर्शने
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ५ - राज्य परिवहन महामंडळाकडे प्रलंबित असलेल्या आर्थिक मागणीची पूर्तता होण्यासाठी, आज दि.०५ मार्च २०२५ रोजी फलटण आगाराच्या गेट समोर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
या निदर्शनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत १) दि १/४/२०२० ते ३१/३/२०२४ या कालावधीत देय होणारी थकबाकी त्वरित देय करा. २) सन २०१८ च्या महागाई भात्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचा मा. न्यायालया च्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा. ३) सन २०१६ ते२०२० या कालावधीत एक तर्फी जाहीर केलेल्या वेतनवाढी च्या घरभाडे वाढीचा दर 8,16,24 टक्के करून थकबाकी त्वरित अदा करा. ४) सन २०१६ ते २०२० च्या कालावधीत एकतर्फी जाहीर केलेल्या वेतनवाढी कामगारांच्या वार्षिक वेतनवाढी चा दर तीन टक्क्यांवरून दोन टक्के इतका केला होता, तो तीन टक्के करून राहिलेली थकबाकी त्वरित कामगारांना अदा करावी. ५) शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना ५३ टक्के महागाई भत्ता थकबाकी सह देण्यात यावा. ६) भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून कामगारांना मागणी नुसार त्वरित उचल देण्यात यावी. ७) अन्यायकारक शिस्त व आवेदन पद्धत बंद करून नवीन शिस्त व आवेदन पद्धत लागू करावी. इत्यादी प्रमुख मागण्या महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.
या वेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष पोपट सोनावले, सचिव योगेश भागवत, संघटक सचिव गणेश सावंत, खजिनदार निरप्पा वाघमोडे, विभागीय सदस्य सुरेश अडगळे, बाळासाहेब जगताप, सुजित जगताप, संघटनेतील जेष्ठ नेते सुरेश पन्हाळे,दत्तात्रय कोळेकर, दिपक बेलदार ,विलास डांगे, प्रवीण बोबडे, गणेश ननवरे , महेश अनिल भोसले, सागर चांगण, निलेश बोधे, नितीन शिंदे इ संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments