लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे सुभाषराव (भाऊ)
शिंदेवाडी गावचे सुपुत्र आणि शरद प्रतिभा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुभाषराव (भाऊ) तुकाराम शिंदे यांचा जन्म दिनांक १९ सप्टेंबर १९४७ रोजी झाला. ते लहानपणापासुनच सर्वाचे लाडके असे व्यक्तिमत्व होते. शिंदेवाडी गावातील सर्व सामान्य लोकांसाठी गरजू व गरिब लोकांविषयी तळमळ व आत्मीयता असायची, लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे. शिंदेवाडी गावातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी गावातच शैक्षणिक संस्था काढण्याचा निर्णय घेतला. शरद प्रतिभा शिक्षण संस्था शिंदेवाडी ही संस्था त्यांनी इ.स. १९९६ मध्ये सुरू केली.
भाऊंकडे मदतीसाठी आलेला माणूस, कोणीही असो. त्यांचे ज्यांच्याकडे काम असेल त्यांना लगेच फोन करून त्यांचे काम पूर्ण करून देत होते. भाऊ फलटण तालुक्यासाठी, गोर-गरिबांच्या सुख दुःखासाठी नेहमी तळमळीने कामे करायचे, तसेच सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर होऊन जंयती, सण साजरे करीत होते. भाऊ नेहमी गोरगरिबांच्या सुख दुःखात सहभागी असायचे.
भाऊ सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नेहमी प्रेरित करत असत. शिक्षकांना व विद्यार्थ्यांना नेहमीच मोलाचे मार्गदर्शन करायचे, चांगले काम केले की, भाऊ नेहमी शिक्षकांना पाठीवर थाप मारून शाबासकी द्यायचे.
भाऊंनी शिंदेवाडी गावातच १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जंयती साजरी करून एकत्रित सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पुढील वर्षी असा कार्यक्रम भव्य स्वरूपात फलटण शहरांमध्ये सर्व समाजाच्यावतीने एकत्रितपणे वैचारिक व विधायक स्वरूपात करू, महाराष्ट्रात आदर्श ठरेल असा हा जंयती महोत्सव सर्व पक्षीय नेत्यांना बरोबर घेऊन करण्यास8 शिंदेवाडीचा हा यशस्वी कार्यक्रम बळ देणारा ठरेल असे भाऊंनी स्पष्ट केले होते.
भाऊ शिंदेवाडी गावातील गोर- गरिबांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी असायचे. शिंदेवाडी गावामध्ये शिंदेवाडी विकास सोसायटी स्थापन करून गोर-गरिब शेतक-यांसाठी खताचे व शेती प्रगत कारण्यासाठी शिंदेवाडी विकास सोसायटी स्थापन केली. शिंदेवाडी गावासाठी भाऊंनी पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा प्राधिकरणाचे काम सुरू केले.अशा या थोर व्यक्तिचा मृत्यु दि. १३ मार्च २०२४ रोजी झाला.
No comments