Breaking News

फलटण येथे महिला दिनी भव्य लावणी महोत्सव व अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण

Grand Lavani Festival and distribution of Ahilyadevi Holkar Award on Women's Day in Phaltan

     फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.७ - फलटण शहर भाजप आणि माऊली फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली फौंडेशन वर्धापन दिन, जागतिक महिला दिन आणि अनुप शहा यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक ८ मार्च रोजी भव्य लावणी महोत्सव, अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण अश्या मनोरंजन , सन्मान आणि आनंदची पर्वणी  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    बारस्कर गल्ली येथील अवस्थान मंदिरासमोर  अहिंसा मैदानावर सायंकाळी ६  वाजता आयोजित करण्यात आलेल्या, या कार्यक्रमांचे उदघाटन जिल्हापरिषदेच्या मा. सदस्या ॲङ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते  करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ. मनिषा समशेरसिंह नाईक निंबाळकर  यांची उपस्थिती आहे. यावेळी घनिष्टा काटकर यांची भव्य लावणी होणार असून, यावेळी  राणी अहिल्यादेवी होळकर पुरस्कार साहित्यीक आणि मल्हार युग पुस्तकाच्या   लेखिका डॉ. सौ. आम्रपाली कोकरे ज्योत्तेनवार यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात  फलटण शहरातील महिला धर्मगुरु यांचे पुजन आणि  फलटण नगर परिषदेच्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थिती महिलांना स्कूटर , सोन्याची नथ , चांदीचा करंङा , पैठणी अश्या २२५ बक्षिसे लकी ड्रॉ पद्धतीने  वाटण्यात येणार आहेत, तरी महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन माऊली फौंङेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

No comments