Breaking News

यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

International Women's Day celebrated with enthusiasm at Yashwantrao Chavan High School and Junior College, Phaltan

     फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. १० मार्च -    श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे दिनांक 8 मार्च, 2025 रोजी जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला.

    प्रथम डॉ.सौ शर्मिला इनामके,  डॉ.सौ सुनिता खराडे, डॉ.शैलजा कदम  तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री थोरात एस. बी., उपप्राचार्य श्री घनवट पी. डी. यांच्या शुभहस्ते पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रा. सौ. शिंदे ए एस. यांनी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून का साजरा करावयाचा व या कार्यक्रमाचा हेतू व महत्त्व आपल्या प्रास्ताविक पर मनोगतामधून व्यक्त केले.

    जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालेमध्ये विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये जागतिक महिला दिन का साजरा केला जातो.समाजामध्ये स्त्रियांना असणारे अनन्य साधारण असे महत्त्व तसेच स्त्रियांचे आरोग व आहार,  शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ,आदर्श महिलांचे स्त्रियांच्या जीवनातील योगदान  याविषयी विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन केले.

    शालेय जीवनामध्ये विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व त्याचा आपल्या शैक्षणिक जीवनावर कसा परिणाम होतो याविषयीची माहिती विविध उदाहरणे देऊन सांगितली. प्रशालेतील विद्यार्थिनींनी आपल्या  आरोग्य विषयी प्रश्न मान्यवरांना विचारून त्याचे निरसन करून घेतले.

    विद्यार्थिनी मनोगतामध्ये कु.सलोनी जगताप या विद्यार्थिनीने जागतिक महिला दिनानिमित्त आपले विचार भाषणांमधून व्यक्त केले.

    प्राध्यापिका मनोगतामध्ये प्रा धुमाळ मॅडम व प्रा सस्ते आर.  एस. मॅडम यांनी काव्यात्मक पद्धतीने  जागतिक महिला दिनाचे महत्त्व विद्यार्थिनींना सांगितले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रशालेचे *प्राचार्य मा श्री थोरात एस. बी. यांनी विद्यार्थिनींना समाजातील आदर्श महिलांची उदाहरणे देऊन स्त्रियांचे समाजात असणारे महत्त्व व स्त्री शिक्षणाने स्त्रियांमध्ये घडून आलेला अमुलाग्र बदल  तसेच  प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो  याविषयी आपले मत मांडले व जागतिक महिला दिनाच्या सर्व विद्यार्थिनी व शिक्षिका यांना शुभेच्छा दिल्या.   *उपप्राचार्य मा श्री घनवट पी. डी. व  माध्यमिक विभागातील ज्येष्ठ शिक्षिका सौ भागवत एस. एम. यांनी उपस्थित सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    या कार्यक्रमाकरिता प्रशालेतील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

    जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कु.फडतरे जे. के. यांनी केले तर आभार प्रा सस्ते आर. एस. मॅडम यांनी मानले.

No comments