मुधोजीच्या पाच विद्यार्थ्यांना व आयसीआयसीआय व ॲक्सिस बँकेचे जॉइनिंग लेटर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ मार्च - मुधोजी महाविद्यालय फलटण अंतर्गत करिअर अँड प्लेसमेंट सेल यांच्यातर्फे आयसीसी बँक व अक्सिस बँक यांच्या कॅम्पस इंटरव्यूवचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 34 जणांनी रजिस्ट्रेशन केले होते. यामधील पाच उमेदवारांचे आयसीआयसीआय बँक व ॲक्सिस बँक यामध्ये रिलेशनशिप ऑफिसर व सिनिअर ऑफिसर म्हणून सिलेक्शन झाले आहे. यामध्ये तेजस चिंचकर, कु प्रीती अडसूळ, कु प्रतीक्षा नलावडे,कु साक्षी शिंदे यांचे आयसीआयसीआय बँक मध्ये रिलेशनशिप ऑफिसर तर कु.कोमल यादव हिचे ॲक्सिस बँक मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून निवड झाली. सदरच्या मुलाखती दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी झाल्या होत्या. आता या विद्यार्थ्यांना रुजू करून घेण्यात आलेले आहे. याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सोसायटी नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर व सोसायटीचे सर्व पदाधिकारी प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य.प्रो.डॉ पी.एच. कदम मुधोजी महाविद्यालयातील प्राध्यापक सी.डी.सी. मेंबर सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
No comments