कोळकी पं. स.सदस्य सचिन रणवरे कोळकी माजी उपसरपंच विकास नाळे यांच्यासह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ - कोळकी येथील माजी पंचायत समितीचे सदस्य सचिन रणवरे यांच्यासह कोळकी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच व सदस्य यांनी राजे गटाला सोडचिठ्ठी देत, भारतीय जनता पार्टीमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोळीगीत तालुका फलटण येथील राजे गटातील कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला, यामध्ये कोळकी येथील कोळकी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य सचिन रणवरे, कोळकी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विकास नाळे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष पैलवान संजय देशमुख, युवा नेते किरण जाधव, सागर चव्हाण, सागर काकडे व इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
प्रवेश केलेले सर्व पदाधिकारी यांचा चांगला जनसंपर्क असून यामुळे भारतीय जनता पक्षाला बळ मिळणार आहे. प्रवेशावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, पैलवान बाळासाहेब काशीद, रणजीत जाधव, संदीप नेवसे, उदयसिंह निंबाळकर, यशवंत जाधव , अँड संदीप कांबळे, स्वागत काशिद, प्रदिप भरते, गणेश शिंदे, वैभव जाधव , धर्मराज देशपांडे, किरण पखाले, महेश गायकवाड, सचिन हजारे, गोरख जाधव, विष्णुपंत फडतरे, महेश लाटे, सुधीर जगदाळे, गणेश मोरे, गणेश वणारे, गणेश वाकुडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments