आदर्की खुर्द गावच्या हद्दीत गाडीने धडक देऊन, कोयत्याने वार करून खून
लोणंद (प्रतिनिधी) दि.२१ - आदर्की खुर्द तालुका फलटण गावचे हद्दीत प्रेमसंबंधवरून बदनामी केली, असा संशय धरून, ऍक्टिवा गाडीला पाठीमागून इर्टिगा गाडीने धडक देऊन, खाली पडल्यावर कोयत्याने वार करून, रत्नशिव संभाजी निंबाळकर रा. आदर्की खुर्द ता. फलटण यांचा खून केल्याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशन मध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 12 /03/ 2025 रोजी सकाळी 10.15 वाजताचे सुमारास आदर्की खुर्द तालुका फलटण जिल्हा सातारा गावचे हद्दीत, आदर्की बुद्रुक ते आदर्की खुर्द जाणारा रोडवर राजेंद्र भालेराव जाधव याचे बांधकाम चालू असलेल्या घराचे समोर दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर राहणार आदर्की खुर्द तालुका फलटण याने, त्याचे प्रेम संबंध बाबत गावात भाऊ रत्नशिव निंबाळकर याने बदनामी केली आहे. असा संशय घेऊन त्याचा राग मनात धरून, विनोद राक्षे रा. आदर्की खुर्द तालुका फलटण याच्याशी संगणमत करून, भाऊ रत्नशिव संभाजी निंबाळकर याचा खून करण्याचे उद्देशाने प्रथम त्याचे एक्टिवा गाडी क्रमांक एमएच -47-व्ही-0549 याला मारुती सुझुकी कंपनीची ईरटीका कार एमएच २६ बीएक्स6546 ने पाठीमागून जोराचे धडक देऊन रत्नशिव निंबाळकर हा खाली पडल्यावर, त्यास विनोद महादेव राक्षे याने धरून, दत्तात्रेय उर्फ काका निंबाळकर याने कोयत्याने हातावर डोक्यात वार करून, त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे. म्हणून माझी दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर, विनोद महादेव राक्षे दोन्ही राहणार आदर्की खुर्द तालुका फलटण तक्रार आहे अशी फिर्याद कमलेश निंबाळकर यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि सुशील भोसले हे करीत आहेत.
No comments