Breaking News

राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने नाजनिन तांबोळी सन्मानित

Najanin Tamboli honored with Rajmata Jijau Gaurav Award

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ मार्च - महिला दिनानिमित्त बारामती येथे जिजाऊ सेवा संघ, अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती तर्फे देण्यात येणारा राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने फलटणच्या किचन क्वीन कुकिंग क्लासेसच्या संचालिका सौ. नाजनिन तांबोळी यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सौ. सुनंदाताई पवार, शरयू फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. शर्मिला पवार व बारामती मधील प्रतिष्ठित महिलावर्ग उपस्थित होता.

    किचन क्वीन कुकिंग क्लासेस च्या संचालिका  सौ. नाजनिन तांबोळी यांनी सातारा पुणे आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये महिलांकरिता पाककलेचे प्रशिक्षण देण्याचे कार्य गेली पंधरा वर्षे सातत्याने करीत आहेत.
ग्रामीण भागातील व शहरी भागातील महिलांना व मुलींना, शाळा, कॉलेज, यूट्यूब ,फेसबुकच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे पाक कलेचे व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे कार्य त्या करीत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन हजारो महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि स्वतःच्या पायावर ठाम उभ्या राहिल्या. यामध्ये  हॉटेल व्यवसाय, फास्ट फूड, केक शॉप, आईस्क्रीम पार्लर ,घरगुती मेस ,केटरिंग, विविध प्रकारचे मसाले तयार करणे, फूड इंडस्ट्री मध्ये यशस्वीरित्या कार्य करीत आहेत. जिजाऊ सेवा संघ व अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती यांच्या वतीने सौ. नाजनीन तांबोळी यांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

No comments