Breaking News

डॉ. श्री .नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून फलटणमध्ये स्वच्छता मोहीम

Nanasaheb Dharmadhikari Foundation conducts cleanliness drive in Phaltan

    दुधेबावी (रोहित सोनवलकर) दि.2- पर्यावरणाचा ध्यास आणि परिवर्तनाची आस या ध्येयाने कार्यरत असलेल्या रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड येथील डॉ. श्री .नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने  येथील प्रांत कार्यालय परिसर , तहसील कार्यालय परिसर , सार्वजनिक बांधकाम विभाग  परिसर , दुय्यम निबंधक  कार्यालय परिसर , दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसर , ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय परिसर तसेच  पंचायत समिती कार्यालय परिसर या सर्व शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये सुमारे 25 टन कचरा गोळा करण्यात आला .

           रविवार दिनांक 02 मार्च 2025 रोजी सकाळी ठिक 8.00 ते सकाळी ठीक 10.30 वाजेपर्यंत धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे 900 ते 950  श्रीसदस्यामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता अभियानामध्ये  एकत्रित संकलन केलेला सुमारे 25 टन ओला व सुका कचरा  फलटण नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड वरती पोहोच करण्यात आला .

        या स्वच्छता अभियानामध्ये फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री . सचिन कांबळे - पाटील ,  सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण तालुका उपविभागीय कार्यालयाचे अधिकारी श्री. विकास व्यवहारे , तहसिलदार डॉ.श्री. अभिजीत जाधव , फलटण तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती खेडकर  - गोयल मॅडम , नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे ,  उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. अंशुमन धुमाळ तसेच सर्व शासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला . व या स्वच्छता अभियानास फलटण नगरपालिकेने संपूर्ण सहकार्य केले . 

          या स्वच्छता अभियानामध्ये फलटण तालुक्यासह वाठार स्टेशन , लोणंद , निरा ,  धर्मपुरी , नातेपुते येथील श्रीसदस्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेऊन हे स्वच्छता अभियान राबवले. धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे आज संपूर्ण देशभर व विदेशामध्ये आजच्या दिवशी हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानाचे फलटण मधील सर्व स्तरातील नागरिकांमधून  कौतुक होत आहे.

No comments