Breaking News

वीजबिल भरा अन् गैरसोय टाळा ; महावितरणतर्फे जाहीर आवाहन

Pay your electricity bill and avoid inconvenience; Public appeal by Mahavitaran

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ मार्च - महावितरण फलटण शहर उपविभागामध्ये फलटण शहर-1, फलटण शहर-2, फलटण शहर-3 व सोमंथळी शाखा अशा ४ शाखा आहेत. उपविभागातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर मिळून थकबाकीदारांची संख्या 5147 इतकी असून त्यांच्याकडे 95.83 लाखांच्या जवळपास थकबाकी आहे.

    वीजबिलाच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने फलटण शहरात वारंवार रिक्षावर भोंगा लावून, ग्राहकांच्या दारात जाऊन वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकांना नोटीसाही दिल्या आहेत. मात्र आता वसुलीसाठी केवळ दहा दिवसच शिल्लक असून आता थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरु आहे. तरी ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा त्वरित भरणा करुन गैरसोय टाळावी.

No comments