सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुरूम ता. फलटण येथे कार्यक्रम ; सभापती व मंत्र्यांची उपस्थिती
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या 332 व्या जयंती निमित्त रविवार दिनांक 16 मार्च रोजी 10.30 वाजता मुरूम तालुका फलटण येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री महादेवराव जानकर, खासदार नितीन काका पाटील, आमदार सचिन पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर, आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार दीपक चव्हाण, आमदार नारायण पाटील, आमदार अतुल भोसले, जि प चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार उत्तमराव जानकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, आमदार बाबासाहेब देशमुख, श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, श्रीमंत अमरजीतराजे बारगळ, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
रविवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता ध्वजारोहण व प्रतिमापूजन ने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुरूम ग्रामपंचायत च्या सरपंच सौ प्रियंका योगेश संकपाळ (बोंद्रे) सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी शबनम मुजावर फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश कुंभार फलटण गटशिक्षणाधिकारी किरण सपकाळ यांनी केले आहे.
No comments