मलठण,फलटण येथे घरातून १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३१ - काळुबाईनगर, मलठण येथे राहत्या घरात पाठीमागील दरवाजा ढकलुन, घरात प्रवेश करून, अनोळखी दोन इसमांनी घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेतील चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही मध्ये काय झाल्या असून, त्या दिशेने पोलिसांचा तपास चालू आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी या दरोड्याचा तपास डीवायएसपी राहुल धस यांनी हाती घेऊन त्वरित चोरांना पकडावे तसेच मलठण येथील पोलीस मदत केंद्र लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी केली.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 28/03/2025 रोजी रात्रौ 10.00 वाजता ते दिनांक 29/03/2025 रोजी रात्रौ. 2.15 वाजण्याच्या दरम्यान काळुबाईनगर, मलठण येथुन राहते घरात पाठीमागील दरवाजा ढकलुन घरात प्रवेश करून अनोळखी दोन इसमांनी, घरातून 30,000/- रूपये किंमतीचे 12 ग्रॅम 500 मिली वजनाची सोन्याच्या चैनमधील मिनी गंठण, 45,000/- रूपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टाँप्स व 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल तसेच 83,000/- रोख रक्कम असा एकुण 1,58,000/- रुपये किंमतीचे कपाटातील दागिणे व रोख रक्कम चोरी करून चोरून नेले फिर्याद उमेश नरसिंग पवार रा. काळुबाईनगर, मलठण, ता. फलटण, यांनी दिली आहे. पुण्याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार सौ.राणी फाळके या करीत आहेत.
No comments