राजुरी येथील राजे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२२ - राजुरी ता.फलटण येथील राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
राजुरी विकास सोसायटीचे संचालक योगीराज साळुंखे, भूविकास बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी. एन. गावडे, संभाजी पवार, ग्रामपंचायत सदस्य डॉ.संदीप हगारे, सोमनाथ गावडे,सौ. सुरेखा सोमनाथ गावडे,सौ. विद्या हेमंत बागाव, राजेंद्र आप्पाजी साळुंखे, बाळासाहेब हगारे, रंगनाथ पवार, भानुदास पवार, अर्जुन हगारे, अनिल गावडे, दादासाहेब रणदिवे, भानुदास गावडे, अनिल खलाटे, सागर पवार, नवनाथ पवार, नितीन पालवे, बाबुराव पवार, परशुराम पवार, संदीप साळुंखे, अमोल पोळ, संजय साळुंखे, राजेंद्र बागाव, राजेश पोळ यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
No comments