Breaking News

महाबोधी महाविहार मुक्ततेसाठी दहिवडी प्रांत, तहसीलदार यांना वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने निवेदन

Representation on behalf of Vanchit Bahujan Aghadi and Indian Buddhist Mahasabha to the Tehsildar of Dahiwadi Province for the liberation of Mahabodhi Mahavihar

    दहिवडी (गंधवार्ता वृतसेवा) दि. तथागत गौतम बुद्ध यांना ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, त्या बिहार राज्यातील  बोधगया येथील चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी महाविहाराची निर्मिती केली. हे ठिकाण जगातील बौद्ध अनुयायांच्या श्रद्धेचे व प्रेरणेचे स्थान असून शतकानुशतके यावर मनुवादी मंडळी कब्जा करून बसलेले आहेत. हे ठिकाण मनुवाद्यांच्या तावडीतून मुक्त करावे तसेच बी टी ऍक्ट १९४९ हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जगभरातील बौद्ध अनुयायी यांची आंदोलने सुरू आहेत. प्रत्येक राष्ट्रातून बौद्ध भिकू या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तरी सुद्धा केंद्र सरकार व बिहार सरकार ठोस पावले उचलत नाही. बिहार सरकारच्या या भूमिकेचा निषेध व महाबोधी महाविहार मुक्त करावे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा माण यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी माण,खटाव, तहसीलदार माण व सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर वंचित तालुका अध्यक्ष युवराज भोसले, माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, बौद्ध महासभेचे ता. अध्यक्ष अरविंद बनसोडे,कुमार सरतापे जिल्हा संघटक,आबासाहेब बनसोडे सचिव ,वसंत बनसोडे बोधचार्य ,नागसेन कांबळे,संतोष कांबळे,स्वप्नील कांबळे,जीवन कांबळे सरपंच पिंगळी , मनोज मिळाले, संजय खरात,संदीप वाघमारे यांच्या सह्या आहेत.
 

No comments