पाणी टंचाई तसेच धोमबलकवडी पाणी आवर्तन नियोजनासाठी फलटण येथे आज आढावा बैठक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ -पाणी टंचाई तसेच धोमबलकवडी पाणी आवर्तनाविषयी नियोजनाबाबत शनिवार, दिनांक २२/०३/२०२५ रोजी पंचायत समिती फलटण येथे फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
फलटण तालुक्यातील पाणी टंचाईच्या तसेच धोमबलकवडी पाणी आवर्तनाविषयी आ. सचिन पाटील, विधानसभा सदस्य, फलटण कोरेगांव विधानसभा मतदार संघ यांचे अध्यक्षतेखाली शनिवार, दिनांक २२/०३/२०२५ रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता सभागृह, पंचायत समिती फलटण येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण, तहसीलदार फलटण, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटण, उपअभियंता, जि.प. बांधकाम उपविभाग फलटण, उप अभियंता, निरा उजवा कालवा विभाग फलटण, उपविभागीय अधिकारी, धोम बलकवडी सिंचन उपविभाग क्र. २, फलटण, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी फलटण, मुख्याधिकारी, नगरपालिका फलटण, गटविकास अधिकारी, पंचायत समिती फलटण, पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक, लोणंद पोलीस स्टेशन, उपविभागीय अभियंता, लघुपाटबंधारे उपविभाग फलटण, उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग फलटण, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण फलटण, उपविभागीय कृषी अधिकारी, फलटण, तालुका कृषी अधिकारी, फलटण, पशुसंवर्धन अधिकारी, पशुसंवर्धन विभाग फलटण आधी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
No comments