आ. सचिन पाटील यांच्याकडून फलटण-बारामती रस्त्याची पाहणी ; गुणवत्ता अहवाल सादर करण्याच्या दिल्या सूचना
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.15 - बारामती रोडच्या सुरु असणाऱ्या सोमंथळी व सांगवी या ठिकाणच्या कामाची पाहणी, आमदार सचिन पाटील यांनी केली. यावेळी रस्त्याच्या कामाबद्दल स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी संबंधित कार्यकारी अभियंता श्री.शेख साहेब व ठेकेदार श्री.शेळके यांना सूचना दिल्या आहेत. यावेळी रस्त्यातील खड्डे, डिव्हाईडर तसेच रोडच्या कामाची गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल तसेच सदर कामाचा गुणवत्ता अहवाल सादर करावा अश्या सक्त सूचना वजा आदेश संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या आहेत. यावेळी युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, युवा नेते संतोष सावंत, चेअरमन महादेव अलगुडे, नाना मोहिते तसेच सोमंथळी व सांगवी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments