सातारा शहर पोलीस ठाण्याचा कारभार महिलांच्या हाती ; जागतिक महिला दिनानिमित्त अनोखा सन्मान
सातारा (गंधवार्ता वृतसेवा) दि.८ - जागतिक महिला दिनानिमित्त सातारा शहर पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार महिलां पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाती सोपवण्यात आला . या सर्व महिलांचा सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सर्व महिलां पोलिसांचा विशेष सत्कार केला याबाबत सातारा पोलीस मुख्यालयाने विशेष नेमणुका एका दिवसासाठी दिल्या.
सातारा शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एस के इंगळे, पोलीस ठाण्यात डे ऑफिसर म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जयस्वाल, ठाणे अंमलदार म्हणून सहायक फौजदार कीर्ती अनबुले, सीसीटीएनएस रोटेशन करता पोलीस कॉन्स्टेबल फाळके , शिंदे, कलगुटकी , देशमुख, धारेराव शेवाळे ,कारकून कामकाज ज्योती गोळे, गोपनीय कामकाज कोमल गोडसे, बार निशी कामकाज पूजा शिंदे,गार्ड अमलदार म्हणून सीमा बेंद्रे यांनी कामकाज पाहिले.
पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रविवार पेठ पोलीस चौकी, सदर बाजार पोलीस चौकी, गोडोली चौकी एमआयडीसी चौकी माहुली चौकी, एसटी स्टँड पोलीस चौकी, येथे देखील महिला पोलीस हवालदार अर्चना कदम,रेणुका सावंत, अश्विनी बनसोडे ,नीलम सूर्यवंशी , शितल सपकाळ ,अर्चना सुडके , अर्चना पवार , के के बोराटे, शैलजा पोतेकर ' वाहतूक नियंत्रण कामकाज गौरी ठाणे राणी मोहिते यांनी पाहिले.
No comments