श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस फलटण येथे विविध उपक्रमांनी साजरा होणार : मा.आ. दिपकराव चव्हाण
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.29 मार्च - विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निरा देवघर, धोम - बलकवडी,एम आय. डी. सी. या सारखे प्रकल्प पूर्ण करून फलटण तालुक्याला सुजलाम सुफलाम केले आहे. दि.३० मार्च रोजी गुढीपाडव्याला त्यांचा 76 वा वाढदिवस संपन्न होत आहे, या पार्श्वभूमीवर श्रीमंत रामराजे यांचा वाढदिवस तालुक्यातील गावागावात विविध उपक्रमांनी साजरा होणार असल्याची माहिती माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी दिली.
फलटण शहराबरोबर ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, अशा वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी दिली. महाराज साहेबांचा वाढदिवस हा एक प्रकारचा उत्सव असतो. याही वर्षी त्याचा वाढदिवस मोठ्या असा साजरा होणार असून, तालुक्यातील सर्व जनतेने यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे लक्ष्मी-विलास पॅलेस, लक्ष्मीनगर, फलटण येथील निवासस्थानी दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 02 पर्यंत शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती माजी आमदार दिपकराव चव्हाण यांनी शेवटी दिली.
No comments