Breaking News

फलटण येथे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा नागरी सत्कार

Special Inspector General of Police Sunil Phulari received a civic reception in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक  श्री. सुनील फुलारी यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. यानिमित्त फलटण येथे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभागाच्यावतीने सजाई गार्डन जाधवाडी ता. फलटण या ठिकाणी मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ रोजी सकाळी दुपारी 1.30 वाजता श्री. सुनील फुलारी यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक मा. डॉ. वैशाली कडूकर यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती प्रभारी अधिकारी फलटण शहर पोलीस स्टेशन, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, खंडाळा, शिरवळ, लोणंद पोलीस स्टेशन यांच्यावतीने करण्यात आली आहे.

No comments