मा. खा. रणजीतसिंह, ना. जयकुमार गोरे व आ.सचिन पाटील यांचे फलटण वकील संघातर्फे आभार
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ - फलटण वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी स्थापना मंजुरी मिळाली आहे, दिवाणी न्यायालयासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील यांचे फलटण वकील संघाच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ ॲड. नरसिंह निकम सर यांनी सर्व वकील संघातर्फे आभार मानले व वरिष्ठ दिवानी न्यायालय, यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले.
तसेच पदस्थापना व कर्मचारी यासाठी विधी व न्याय विभागामार्फत अंतिम मान्यता व निधीची तरतूद, मंत्रिमंडळाकडून होण्यासाठी फलटण वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. मयुरी शहा यांनी विनंती केली.
यावेळी ॲड. रेश्मा गायकवाड, ॲड.फरीदा पठाण, ॲड. कोमल जाधव, ॲड. सचिन शिंदे, ॲड. नितीन जाधव,ॲड. राहुल बोराटे, ॲड.विवेक ढालपे, ॲड. सुरज शिरसागर, ॲड. अभिजीत यादव, ॲड. इम्रान तांबोळी, ॲड. राहुल मदने, ॲड. सुनील शिंदे, ॲड. सस्ते ॲड. अविनाश अभंग, ॲड. विश्वजीत सस्ते, ॲड. तेजस मोरे, ॲड. नामदेव शिंदे व फलटण वकील संघाचे इतर वकील उपस्थित होते.
No comments