श्रीराम कारखान्याचा कारभार संचालक मंडळच पाहणार - उच्च न्यायालय
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२८ - श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर राज्य शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली होती. या निर्णयाच्या विरोधात श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते. यामध्ये प्रशासकाची नियुक्ती रद्द करून, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा कारभार संचालक मंडळाने पहावा असे आदेश उच्च न्यायालयाने पारित केले आहेत.
श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर फलटणचे प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले गेले होते. मात्र, या निर्णयाच्या विरोधात विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ उच्च न्यायालयात गेल्यानंतर, उच्च न्यायालयाने व्यवस्थापन समितीचे सदस्य पुढील आदेशापर्यंत कोणताही मोठा धोरणात्मक निर्णय घेणार नाहीत आणि त्यांना पुढील आदेशापर्यंत कारखान्याचे दैनंदिन व्यवस्थापन करण्याची परवानगी दिली आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत काही दिवसांपूर्वीच संपली होती. निवडणूकाच्या प्रक्रियेतील अनेक कचरई आणि तक्रारींमुळे विश्वासराव भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये मतदार यादींबाबत केलेल्या वादांचा समावेश होता. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकांना पुढे ढकलण्यात आले होते.
No comments