सुरवडी येथे भारत लॉजेस्टीक कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.८ - मौजे सुरवडी ता. फलटण गावचे हद्दीत भारत सिप्ट लॉजेस्टीकच्या गोडाऊन समोर ठेवलेल्या लुकास टीव्हीएस लि.पार्टच्या पॅलेट बॉक्स ठेवले होते त्यामधून एक पॅलेट बॉक्स एक लाख 123548 रुपये किंमतीचा एक पॅलेट बॉक्स आज्ञात चोरट्याने चोरून नेला.
याबाबत अधिक माहिती अशी,दिनांक 04/01/2025 ते सायंकाळी 18.00 वाचे ते दिनांक 06/01/2025 रोजीचे सकाळी 09.00 वाजण्याच्यादरम्यान वेळ नक्की माहीत नाही मौजे सुरवडी ता. फलटण गावचे हद्दीत भारत सिप्ट लॉजेस्टीकच्या गोडाऊन समोर चैन्नई वरुन आलेला माल ठेवला होता. त्या पॅलेट बॉक्समधून कोणीतरी अज्ञात चोरटयाने एक पॅलेट बॉक्स चोरून नेला आहे. एका पॅलेट बॉक्समध्ये लुकास टीव्हीएस लि.ची यंत्रसामुग्री असून याची किंमत 123548 रुपये इतकी असल्याची फिर्याद अजिंक्य नारायण अटक रा. साखरवाडी तालुका फलटण यांनी दिली आहे.
No comments