Breaking News

बरड व कुरवली बु. येथून पाणी उपसा मोटर व सोलर पॅनलची चोरी

Theft of water pump motor and solar panel from Barad and Kuravli B.

फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.८ - मौजे बरड तालुका फलटण व कुरवली बुद्रुक तालुका फलटण येथून पाणी उपसा करणारी मोटार, स्टार्टर व 9 सोलर पॅनल असा एकूण 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, दि.05/03/2025 रोजी सायंकाळी 07.00 वाजता ते दि.06.03.2025 रोजी सकाळी 10.00 वाजण्याच्या दरम्यान, मौजे बरड ता. फलटण गावचे हद्दीत जमिन गट नंबर 700/ब/2 मध्ये असलेल्या अनुदानीत सोलरवर पाणी उपसा करणारी मोटर व स्टार्टर तसेच मौजे कुरवली बु (दत्तनगर) ता. फलटण गावचे जमिन गट नंबर 425 मधुन रामचंद्र शिवाजी बाबर यांच्या मालकीच्या शासन अनुदानीत सोलरच्या 09 प्लेटा  ज्यामध्ये 1) 15000/- रुपये किंमतीचा एक क्रॉम्टन कंपनीची 5 एच.पी पॉवर मोटार 2) 10000/- एक क्रॉम्टन कंपनीचा पाणी उपसा करणेसाठी मोटारीस जोडलेला स्टार्टर 3) 45000/- त्यामध्ये शक्ती कंपनीच्या एकूण 09 सोलर प्लेटा प्रत्येकी एका सोलर प्लेटची लांबी 5 फुट रुंदी 4 फुट  4) 10000/- एक शक्ती कंपनीचा पाणी उपसा करणेसाठी मोटारीस जोडलेला स्टार्टर असा एकूण 80000/- रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याची फिर्याद संतोष रामदास गावडे रा. गोखळी तालुका फलटण यांनी दिली आहे.

No comments