बर्गेवाडी येथे शिकार करण्याच्या प्रयत्नात दोघे ताब्यात
सातारा (दिनांक 21 प्रतिनिधी) - बर्गेवाडी तालुका पाटण येथे वन्य प्राण्याची शिकार करण्याचे उद्देशाने निघालेल्या दोघांना वनविभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. प्रकाश तुकाराम कदम, दिनेश शिवाजी यादव दोघे राहणार मराठवाडा तालुका पाटण यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शिकारीच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले शिकारीचे फासं हस्तगत करण्यात आले आहेत.
बर्गेवाडी येथे सापळा रचून काही लोक शिकार करणार असल्याची माहिती पाटण तालुक्याचे वनपरिक्षेत्राधिकारी राजेश नलावडे यांना मिळाली होती. त्यानुसार साताऱ्याच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक संरक्षक महेश झांजुर्णे यांच्या सूचनेनुसार पाटण वनविभागाने बर्गेवाडी तालुक्यातील झुरीच्या ओहोळ परिसरात सापळा रचला या सापळ्यामध्ये दोन्ही आरोपी ताब्यात आढळून आले.
बुधवार दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली . या दोघांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पाटणचे वनपाल रोहित लोहार,निखिल कदम, वनरक्षक साईराज बहुले यांनी भाग घेतला होता.
No comments