फलटण येथे एसटी चढताना महिलेचे मनी मंगळसूत्र लंपास
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ - फलटण एसटी स्टँड येथे एसटी बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील २९ हजार ५०० रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र चोरल्या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक 18/02/2025 रोजी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास एस.टी.स्टँड, फलटण, ता. फलटण येथे जामखेड - कोल्हापूर या एस.टी. बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेऊन 29,500/- रू. किंमतीचे 3 ग्रॅम 500 मिली वजनाची 2 डोरली व 1 ग्रॅम वजनाचे 4 मणी असे काळ्या मण्यात ओवलेले मंगळसुत्र कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले असल्याची फिर्याद मानसी बर्गे यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.
No comments