Breaking News

फुले जयंतीच्या शोभायात्रेत सामाजिक एकतेचे दर्शन

A glimpse of social unity in the procession of Phule Jayanti

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.20 - फलटण हे ऐतिहासिक शहर असून फलटणला नेहमीच सामाजिक एकता व सलोख्याचे दर्शन नागरिकांकडून होत असतेगेल्या दोन वर्षात विविध कारणांमुळे संपूर्ण राज्यात सामाजिक सलोखा काही प्रमाणात बिघडला असताना फलटण मधील विविध समाजाच्या व जातीधर्माच्या नागरिकांनी मात्र सामाजिक सलोखा जपला आहे त्याचेच प्रत्यंतर क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या १९८ व्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत दिसून आले.

    शोभा यात्रेत एरव्ही कर्णकर्कश आवाजात डी जे चे आवाज सोडले जातात हिंदी मराठी गाण्यांवर नाच केले जातात मात्र फलटण याला अपवाद ठरत महापुरुषांची गीते वाजवून त्यांना अभिवादन करण्यात आले क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या मार्गात असणाऱ्या महात्मा गांधी चौक येथे देशभक्तीपर गीते लावण्यात आली तर राजे उमाजी नाईक चौकात त्यांच्या कार्यावर आधारित गीत वाजवण्यात आले.

    पुढे महावीर चौक येथे शांतीचा संदेश देत चौक पार करे पर्यंत शांतता पाळण्यात आली तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात तब्बल चौदा भीमगीते लावून डॉ बाबासाहेब यांच्या कार्याचा उजाळा या ठिकाणी करण्यात आला यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी शोभयात्रेचे स्वागत केले.

    सर्वात शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांची कीर्ती सांगणारे पोवाडे व गीते वाजवली गेली ही शोभा यात्रा एक आदर्श शोभायात्रा होती सर्वच फलटणकर नागरिकांनी या शोभा यात्रेचे कौतुक व स्वागत केले.

    शोभायात्रा शांततेत पार पाडल्या बद्दल व सामाजिक सलोखा जपत एक नवा आदर्श घालून दिल्याबद्दल फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी समितीचे कौतुक केले

0000000000000


 

No comments