फलटण येथे दुर्मिळ असा रुका सर्प आढळला
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२१ - फलटण मधील नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी फलटणचे प्रतिनिधी रवींद्र लिपारे यांना जायका फास्टफूड लक्ष्मीनगर येथून, आमच्या इथे झाडावर साप असून तो रेस्क्यू करण्यासाठी तात्काळ या असा फोन आला, त्यानंतर समक्ष जाऊन पाहणी केली असता तेथे अत्यंत दुर्मिळ असा रूका ( Bronzz Back ) सर्प आढळून आला, त्याला संस्थेच्या सदस्यांनी पकडून, निसर्गाच्या अधिवासात मुक्त केले.
कोणतेही वन्य जीव आढळून आल्यास नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण मो. 8087067116 येथे संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
No comments