मुधोजी महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी ॲड. डॉ. ए.के.शिंदे यांना वनविभागाकडून 2025 चा वनश्री पुरस्कार
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.४ - फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे मुधोजी महाविद्यालय फलटण येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी ॲड. डॉ. अशोक कृष्णा शिंदे यांना महाराष्ट्र शासन वन विभाग सातारा परिक्षेत्र चा वन्यजीव संवर्धन व निसर्ग संवर्धनामध्ये करीत असलेल्या ईश्वरीय कार्याबाबत वनश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
पुरस्कार दिनांक 21 मार्च, जागतिक वन दिवसा निमित्त 'वन वनवा परिसंवाद' व 'पुरस्कार वितरण' कार्यक्रम फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालयात पार पडला सातारच्या उपवनसंरक्षक भा.व.से. मा. श्रीमती आदिती भारद्वाज यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मध्ये श्री.दिगंबर जाधव, मा. प्राचार्य रवींद्र येवले, कवि श्री हनुमंत चांदगुडे, हनुमंत सोनवलकर, श्री. हरिचंद्र वाघमोडे, कथाकथनकार रविंद्र कोकरे, सचिन रघततवाम व रानकवी श्री राहुल निकम वन अधिकारी फलटण उपस्थित होते.
हा पुरस्कार स्वीकारताना ऍड. डॉ.ए. के. शिंदे यांच्याबरोबर एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रम अधिकारी एस. एस. लवांडे व एन.एस.एस. कमिटी सदस्य डॉ. मठपती वाय. आर. , प्रा.ललित वेळेकर, प्रा.किरण सोनवलकर, प्रा. रेश्मा निकम व एन.एस.एस. विभागाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.
तसेच फलटणमधील बहुसंख्य नागरिक विविध पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील व वन अधिकारी उपस्थित होते.
या निमित्त मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य.प्रो.(डॉ.) पी.एच. कदम, अंतर्गत गुणवत्ता हमीकक्षाचे समन्वयक प्रो. (डॉ.) टी. पी. शिंदे, मराठी विभाग प्रमुख प्रो. (डॉ.) प्रभाकर पवार, कला शाखा प्रमुख प्रो. डॉ. ए. एन. शिंदे व तर इतर विभागाचे विभाग प्रमुख यांनी एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रम अधिकारी ऍड. (डॉ.) ए. के. शिंदे आणि कमिटी सदस्य व एन.एस.एस. विभागाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचे अभिनंदन केले.
याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सोसायटी नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर व सोसायटीचे सर्व पदाधिकारी प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य.प्रो.(डॉ.) पी.एच. कदम मुधोजी महाविद्यालयातील प्राध्यापक सी.डी.सी. मेंबर सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
No comments