फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. नितीन जाधव, उपाध्यक्षपदी अॅड.सागर देशपांडे तर सचिवपदी अॅड.निलेश भोसले
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण वकील संघाच्या सन २०२५-२६ वर्षीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड. नितीन एन. जाधव, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अॅड. सागर देशपांडे तर सचिव पदाच्या निवडणुकीत अॅड.निलेश भोसले हे विजयी झाले. उर्वरित पदाधिकार्यांच्या निवडी या बिनविरोध करण्यात आल्या. विजयी उमेदवारांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
फलटण वकील संघाच्या सन २०२५-२६ यावर्षीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अॅड. नितीन एन. जाधव व अॅड. सुजाता माने प्रधान हे २ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. दोघांमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अॅड. नितीन एन. जाधव हे विजयी झाले. तर अॅड. सागर देशपांडे व अॅड. मेघा अहिवळे हे उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक रिंगणात होते, त्यामध्ये अॅड. सागर देशपांडे हे विजयी झाले. अॅड.निलेश भोसले व अॅड. रेश्मा पठाण हे सचिव पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये अॅड.निलेश भोसले विजय झाले.खजिनदार अॅड. स्वरदा जाधव, सहसचिव अॅड.अभिषेक राऊत, सदस्य अॅड. निकिता रसाळ व अॅड. निशा कदम या पदाधिकार्यांच्या निवडी या बिनविरोध करण्यात आल्या.
फलटण वकील संघाच्या निवडणुकीमध्ये निवडणुक निर्वाचन अधिकारी म्हणुन अॅड. आर.वाय. कदम, अॅड. धीरज टाळकुटे व अॅड. विवेक ढालपे यांनी कामकाज पाहिले.
No comments