तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचे फायदे मिळवून देणार - आमदार सचिन पाटील
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१० - महायुतीचे सरकारच्या माध्यमातून फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील जनतेला बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळवून देणार आहे, आज फलटण येथे तालुक्यातील लाभार्थीचे बायोमेट्रिक करण्याचे काम, श्री दत्त गार्डन कार्यालय, मयुरेश्वर मंगल कार्यालय येथे सुरू आहे. या कार्यक्रमाचे ठिकाणी आमदार सचिन पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, लतीफभाई तांबोळी , राजेश शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी व विधानसभा निवडणुकीपूर्वी या तालुक्यांमध्ये मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली २० हजार लाभार्थ्यांना भांडी वाटप व पेटी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला होता. आता लवकरच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील २५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत व कामगार मंत्री ना.आकाश फुंडकर व मा.खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे तरी या तालुक्यातील जनतेने जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. या योजनेअंतर्गत जन्मापासून ते मृत्यूपर्यंत याचे सर्व लाभ आहे, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच मुलींच्या लग्नासाठी पैसे, बांधकाम कामगारांना दवाखान्यासाठी अर्थ साह्य योजना असे अनेक लाभ देण्यात येतात. या तालुक्यातील बांधकाम कामगार संघटना खुप चांगले काम करीत आहेत. लोकांचे फॉर्म भरून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले.
यावेळी आमदार चे फलटण बांधकाम कामगार संघटनेचे वतीने शांताराम कारंडे यांनी सत्कार व स्वागत केले.
No comments