Breaking News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे आज भव्य शोभायात्रा

Bharat Ratna Dr. Grand procession in Phaltan today on the occasion of Babasaheb Ambedkar's birth anniversary

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ एप्रिल -  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त फलटण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, आज सोमवार दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची व विचारांची भव्य शोभा यात्रा शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात येणार आहे.

    काल रविवार दि. १३ रोजी रात्री १२ वाजता  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आंबेडकरी नूतन वर्षाचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत आणि त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.  सोमवार दि. १४ रोजी सकाळी ८ वाजता फलटण येथे भीमज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे.  सायंकाळी ७ वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ, फलटण येथून मान्यवरांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा  व विचारांची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात येणार आहे.

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा  व विचारांची भव्य मिरवणूकीचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार दीपकराव चव्हाण, विद्यमान आमदार सचिन पाटील, इन्कम टॅक्स कमिशनर तुषार शांताराम मोहिते, जीएसटी कमिशनर ऋषिकेश राम अहिवळे, महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, नगरपरिषद माजी विरोधीपक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरपरिषद मुख्याधिकारी निखिल मोरे या मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.

    तसेच यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवरूपराजे  खर्डेकर, के. बी. एक्स्पोर्ट्सचे संचालक सचिन यादव, युवा उद्योजक अमितशेठ भोईटे, माजी नगरसेवक मिलिंद नेवसे, सौ. वैशाली सुधीर अहिवळे, सनी संजय अहिवळे, सचिन रमेश अहिवळे, माजी उपनगराध्यक्ष नितीनभैय्या भोसले, युवा नेते सह्याद्रीभैय्या कदम, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, प्रांताधिकारी श्रीमती प्रियंका आंबेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, तहसीलदार प्रतीक आढाव  यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

No comments