बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत भ्रष्टाचार ; फेर तपासणी न केल्यास आत्मदहनाचा इशारा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ - कामगार उपयुक्त यांनी काही संस्थांना हाताला धरून मोठा भ्रष्टचार केला आहे, जे बंगल्यात राहतात त्यांची बिगारी म्हणून नोंद आहे, ज्या महिलेंचे ब्युटी पार्लर आहे त्याची सुद्धा बिगारी म्हणून नोंद आहे, हे सगळे पुरावे आमच्याकडे असून सातारचे उप कामगार आयुक्त यात शामिल असून 1 जानेवारी ते आज अखेर पर्यंत जेवढ्या नोंदी झाल्या आहेत, त्या सर्व रद्द कराव्यात आणी वरिष्ट अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत अन्यथा दिनांक 29/4/2025 रोजी आत्मदहन करण्यात येईल असा इशारा कामगार संघटनेकडून तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात भ्रष्टाचाराची प्रकरण समोर आल्याने या विषयावरून व्यापक चौकशी सुरू झाली आहे. ही चौकशी कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे कामगारांना न्याय मिळेल याची आशा आहे.
कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या विविध पैलूंवर प्रकाश पाडला गेला आहे. यात कामगारांना नोंदणीसाठी अनावश्यक पैसे मागणे, नोंदणी प्रक्रियेतील विलंब, आणि कामगारांच्या हक्कांची पायमल्ली करण्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. पत्रात या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची उदाहरणे दिली गेली आहेत आणि या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत आहोत व"बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेतील भ्रष्टाचार हा एक गंभीर मुद्दा आहे आणि त्याच्यावर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी ही चौकशी महत्त्वपूर्ण आहे.
No comments