उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले श्रीमंत रामराजेंच्या अनुपस्थितीचे कारण
सातारा दिनांक 19 (प्रतिनिधी) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शनिवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पिंपोडे बुद्रुक येथील शेतकरी मेळाव्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची अनुपस्थिती होती. तेथील उभारण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा फोटो सुद्धा नव्हता त्याची प्रसार माध्यमात उलट सुलट चर्चा सुरू झाली. या चर्चेला फटकारताना उपमुख्यमंत्री अजितदादांनी रोखठोक टोलेबाजी केली. अजितदादा म्हणाले माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्ही काळजी करू नका, मी खंबीर आहे तुम्ही तुमच्या पत्रकारितेची काळजी करा, रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्नी आजारी असल्यामुळे कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवली आहे, तसा त्यांनी मला फोन केला होता, असे सांगून दादांनी सर्व उलट सुलट चर्चांना पूर्णविराम दिला.
जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानंतर पत्रकारांची संवाद साधताना दादांनी रोखठोक शैलीचा अवलंब केला, ते म्हणाले जे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे पक्षाच्या मजबुती करण्या करिता मदत करतात त्यांना वाऱ्यावर मी कधी सोडणार नाही, रामराजे नाईक निंबाळकर हे आमच्या पक्षाचे आमदार असून, त्यांना कुठे अडचण असेल तर आम्ही मदत करू. रामराजेंनी मला काही घरगुती कारणास्तव फोन केला होता, ते येऊ शकले नाहीत. माझ्या पक्षाची तुम्ही काळजी करू नका मी खंबीर आहे सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी जनतेच्या पाठिंब्यावर मजबूत होणारच असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे व राज ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले ठाकरे कुटुंबातील बंधूंचा तो अंतर्गत प्रश्न आहे . त्यांच्या एकत्र येण्याने मुंबईत काय अडचण होऊ शकते का? यावर तुम्हाला काय अडचण आहे असा दादांनी प्रतिप्रश्न प्रसार माध्यमांना केला .दोन्ही बंधूंच्या भूमिका कदाचित एकमेकांना पूरक असू शकतात या संदर्भात दोन्ही पक्षांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी एकत्र यावा की न यावं हे इतर कोणत्याही राजकीय पक्षांनी सांगण्याची गरज नाही प्रत्येकाने आपल्या बुद्धीला स्मरण योग्य तो निर्णय घ्यावा असे पवार म्हणाले .उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेला टिके बाबत विचारले असता अजित पवार म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झाल्यावर या गोष्टी येणारच आहेत .पण जनतेला माहित आहे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्यातून निघून कधी गेले .ते नवीन टेक्नॉलॉजीचा वापर नवीन पद्धतीने करत आहेत त्यामुळे प्रत्येकाला आपापले मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले.
No comments