कोळकी येथे झालेल्या अपघातात वृद्ध ठार
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ - कोळकी ता.फलटण येथे शिंगणापूर रोडवर, दुचाकीवरून चाललेल्या वृद्धाला समोरून आलेल्या पिकप या चार चाकी वाहनाने धडक दिल्याने, झालेल्या अपघातात वृद्ध ठार झाला असून, पिकप चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार,
दि.०५/०४/२०२५ रोजी १० वाजण्याच्या सुमारास श्रीराम बझार, कोळकी शाखे समोर, शिंगणापूर रोडवर, कोळकी येथे मधुकर विठ्ठल शेवते वय ७२ वर्षे हे चालवत असलेल्या बजाज डिस्कव्हर मोटार सायकल क्र. एम एच ११ ए व्ही ३८१३ ला पुढील बाजुने इन्ट्रा पिकअप वाहन क्र.एम एच १० डी टी ५३६४ वरील गाडीचे ड्रायव्हर अरविंद मोरे याने स्वत:चे ताब्यातील पिकअप हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात चालवुन धडक देवुन शेवते यांना गंभीर दुखापत करून त्यांचे मृत्युस तसेच मोटार सायकलचे नुकसानीस कारणीभुत झाला असल्याची फिर्याद महेश मधुकर शिवते यांनी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास स.पो.नि.नितीन नम हे करीत आहेत.
Post Comment
No comments