Breaking News

एटीएम कार्ड बदलून १ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक

Fraud of Rs 1 lakh 76 thousand by changing ATM card

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१८ - राजुती ता.फलटण येथील शेतकऱ्याचे एटीएम कार्ड बदलून, त्या एटीएम कार्डचा उपयोग करून, फलटण शहरातील विविध एटीएम मधून १ लाख ७६ हजार रुपये काढून शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३/४/२०२५ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास एस.बी.आय. बँक ए.टी.एम., लक्ष्मीनगर, फलटण येथे पोपट दत्तोबा साळुंखे, वय 57 वर्षे, व्यवसाय- शेती, रा.राजुरी (भवानीनगर), ता.फलटण हे ए.टी.एम.मशिन मधुन पैसे काढण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांचे डाव्या बाजूला उभा राहिलेल्या अनोळखी इसमाने त्यांचे ए.टी.एम. कार्ड त्याच्या हातात घेऊन पोपट दत्तोबा साळुंखे यांना म्हणाला की, काका तुमचे ए.टी.एम.मधून पैसे निघत नाहीत, हे घ्या तुमचे ए.टी.एम.कार्ड, आम्हाला पैसे काढायचे आहेत, असे म्हणुन सदर अनोळखी इसमाने पोपट दत्तोबा साळुंखे यांचे ए.टी.एम.कार्ड मशिनमधुन काढले व नकळत हातचलाखी करून त्याचेकडील मधू कौदरे या नावाचे ए.टी.एम. पोपट दत्तोबा साळुंखे यांना दिले व त्यांचे  पोपट दत्तोबा साळुंखे या नावाचे ए.टी.एम.त्याच्याकडे घेऊन त्या ए.टी.एम. कार्ड मधून विविध एटीएम असलेल्या ठिकाणाहून पैसे काढून एकूण १ लाख ७६ हजार ३५१ रुपयांची फसवणुक केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार पूनम बोबडे या करीत आहेत.

No comments