फलटण मध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमासह भव्य दिव्य पारंपारिक मिरवणूक
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ - छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती फलटण तालुक्याच्या, फलटण नगरीत परंपरागत शिवजन्मोत्सव सोहळा मंगळवार, दि.२९ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवजन्मोत्सव सोहळा कार्यक्रम यामध्ये सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ०८:३० वाजता शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, फलटण येथे स्वराज्याचा छावा, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री ११:३० वाजता शिवछत्रपतींचा अभिषेक सोहळा संपन्न होईल.
मंगळवार, दिनांक २९ एप्रिल २०२५ सकाळी ०८:०० वाजता, मुधोजी क्लब, माळजाई मंदिर परिसर, फलटण येथून भव्य बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक २९ एप्रिल २०२५ सायं. ०५:३० वाजता भव्य दिव्य पारंपारिक मिरवणूकीचा मुधोजी क्लब, माळजाई मंदिर परिसर, फलटण प्रारंभ होईल. तरी सर्व शिवभक्त, शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती फलटण तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments