Breaking News

फलटण तालुक्यातील वाडी वस्तीवर गाव - बस्ती संपर्क अभियान राबवा - मा. खा. रणजितसिह नाईक निंबाळकर

Implement village-basti connectivity campaign on Wadi settlements in Phaltan taluka - Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ - फलटण येथे प्रदेश भाजपच्या सुचनेनुसार  गाव बस्ती संपर्क अभियानाची सुरुवात मा. खा.रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, वाठार स्टेशन मंडल अध्यक्ष अमित रणवरे , कोळकी मंडल अध्यक्ष लक्ष्मण सोनवलकर , फलटण मंडल अध्यक्ष बापुराव शिंदे, मा. अध्यक्ष बजरंग गावडे, जिल्हा उपाध्यक्ष संदिप चोरमले, सुधीर अहिवळे , पंचायत समिती सदस्य संजय कापसे, माजी नगरसेवक अजय माळवे उपस्थित होते.

    यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केन्द्र व राज्य शासनाच्या राबविलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच या अभियानात मध्ये प्रत्येक बुथ अध्यक्ष व प्रमुख नेते , कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात जाऊन मंदिरे स्वच्छ करावीत, गावातील शाळा, दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालय, येथे भेट दयावी. तसेच गावातील लाभार्थींच्या भेटी घेऊन संपर्क साधावा असे आवाहन केले.

    यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी अभियानाची माहिती दिली व जिल्हा मध्ये हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व मंडल अध्यक्ष, आघाडी मोर्चा चे पदाधिकारी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

No comments