फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२८ - महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट काम करणारे व निष्कलंक सेवा बजावणारे अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह हे पदक देवुन गौरवण्यात येते. यावर्षी फलटण उपविभागाचे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.
पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर व जिल्ह्यातील तसेच फलटण उपविभागतील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी राहुल धस यांचे अभिनंदन केले आहे.
No comments