सकल जैन समाज फलटण च्यावतीने आज जाहीर निषेध मोर्चा
Public protest march today on behalf of Sakal Jain Samaj Phaltan
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० - आज सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी फलटण येथे, जैन समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुंबईतील विलेपार्ले येथे असलेले श्री 1008 पार्श्वनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर हे मुंबई महानगरपालिकेने बेकायदेशीररित्या पाडल्या बाबत मंदिरावर आलेले हे संकट म्हणजेच जैन समाजावर आलेले संकट आहे, या गोष्टींचे भान ठेवून, या संकटाशी मुकाबला करण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व जैन बांधव भगिनी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
तसेच जबलपूर येथे भाजप नेत्याने जैन समाजावर केलेल्या वक्तव्याच्या निषेध आणि मध्यप्रदेश येथे जैन साधू वर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जैन साधूंच्या विहारा प्रसंगी त्यांना पोलीस संरक्षण मिळण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे,, हा मोर्चा आज सोमवारी सकाळी आठ वाजता श्री 1008 आदिनाथ भगवान जैन मंदिर शुक्रवार पेठ फलटण येथून शुक्रवार पेठ टोपी चौक पाच बत्ती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक भगवान महावीर स्तंभ महात्मा फुले चौक ते अधिकार गृह येथील प्रांत कार्यालयापर्यंत असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे .सर्व जैन समाज पांढरे कपडे आणि काळी रिबीन लावून आज हा मोर्चा पार पडेपर्यंत आपली दुकान आणि व्यवसाय बंद ठेवणार आहेत. असे आवाहन सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments