Breaking News

विधानमंडळाच्या विविध समित्यांवर रामराजे नाईक निंबाळकर यांची निवड

Ramraje Naik Nimbalkar elected to various committees of the Legislative Assembly

    मुंबई, दि. 24  :महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सन 2024-2025 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची तसेच समिती प्रमुखांची नियुक्ती केली आहे. समिती पद्धतीला संसदीय लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नि:सत्र कालावधीत समिती कामकाजाच्या माध्यमातून कायदेमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रणाचे कार्य सुरु असते. भारतीय राज्यघटनेतील सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन  हे तत्व समितीपध्दतीमुळे अधिक प्रभावीपणे अंमलात येत असते. विधिमंडळाच्या विविध व त्यांचे प्रमुख आज जाहीर करण्यात आले. यामध्ये विविध समितींवर विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी भाषा समिती (विधानपरिषद नियम 214 ड)
(1) श्री.संजय केनेकर, वि.प.स.
(2) श्री.रामराजे नाईक-निंबाळकर, वि.प.स.
(3) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.
(4) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.
नियम समिती (विधानपरिषद नियम 218)
(1) समिती प्रमुख - प्रा. राम शिंदे, मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.
सदस्य - (2) श्री.प्रविण दरेकर, वि.प.स.
(3) श्री.निरंजन डावखरे, वि.प.स.
(4) श्रीमती भावना गवळी, वि.प.स.
(5) श्री.रामराजे नाईक निंबाळकर, वि.प.स.
(6) श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, वि.प.स.
(7) ॲङ.अनिल परब, वि.प.स.
विशेष निमंत्रित
श्रीमती उमा खापरे, वि.प.स.
वातावरणीय बदलासंदर्भातील संयुक्त तदर्थ समिती
समिती प्रमुख - प्रा. राम शिंदे, मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.
सह समिती प्रमुख - ॲड. राहुल नार्वेकर, मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा.
सदस्य - 1) श्री.निरंजन डावखरे, वि.प.स.
(2) श्री.रामराजे नाईक निंबाळकर, वि.प.स.
(3) श्री.राजेश राठोड, वि.प.स.
(4) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.
   विशेष निमंत्रित
(1) अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
(2) सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ.
(3) संचालक, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
मा.सभापती,महाराष्ट्र विधानपरिषद हे या समितीचे समिती प्रमुख राहतील.

    मा.अध्यक्ष,महाराष्ट्र विधानसभा हे या समितीचे सह समिती प्रमुख राहतील. मा.पर्यावरण मंत्री,महाराष्ट्र राज्य तसेच मा.पर्यावरण राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य हे या समितीवर पदसिध्द सदस्य म्हणून राहतील.

No comments