मा.खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर पाणपोईचे आ.सचिन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ - बारस्कर चौक फलटण येथे सालाबाद प्रमाणे मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पाणपोईचे उद्घाटन फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलताना म्हणाले दरवर्षी हा उपक्रम अजीजभाई करत असतात. नेहमीच सामाजिक कार्यामध्ये हीरारीने सहभाग घेतात, त्याचेच उदाहरण म्हणजे आजची पाणपोई सुरू करणे होय. आजच्या काळात प्रत्येकाला वीस रुपयाची बिसलरी घेणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही,पाणी म्हणजे एक जीवन आहे. माणसाची सेवा हाच खरा धर्म हीच खरी मानवता होय. अजिजभाईंनी पाणपोई सुरू करून, लोकांची तहान भागवून पुण्याचे काम केले असल्याचे मत आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक अनुप शहा,अरुण खरात सर,राहुल शहा,राजाभाऊ देशमाने,तौफिक शेख,असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments