दररोज महापुरुषांना अभिवादन ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा उपक्रम

Salute to great men every day; Initiative of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Mahotsav Committee

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव  समिती २०२५ च्या वतीने १ एप्रिल २०२५ पासून अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.त्यामध्ये दररोज एका महापुरुषास अभिवादन करून, महापुरुषांचे विचार विशिष्ट चौकटीत न राहता, ते सार्वत्रिक व्हावे, त्यांचे विचार सर्वांना समजावे यासाठी सर्व महापुरुषांच्या विचारांची पुस्तके वितरित केली जाणार आहेत.

    दि.१ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून विविध महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकांचे वितरण आले. तर आज २ एप्रिल रोजी, प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन समोर असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पपुतल्यास अभिवादन करून,  विविध महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकांचे वितरण शिवप्रतीष्ठान फलटण आणि मोती चौक तालीम शिवजयंती महोत्सव फलटण यातील पदाधिकाऱ्यांना करण्यात आले.यावेळी जयंती मोहोत्व समिती मधील गणेश अहिवळे, अजय काकडे, गोविंद काकडे, सुरज काकडे, सिद्धार्थ अहिवळे. भूषण बनसोडे, चंद्रकांत मोहिते, मंगेश सावंत, कपिल काकडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments