मा.आ. दिपकराव चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१४- : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या "जयंती" निमित्त आंबेडकर चौक, फलटण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मा.आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा यांनी अभिवादन केले, यावेळी मा.नगरसेवक सनी अहिवळे, श्रीराम कारखाना संचालक महादेवराव माने, दादासाहेब चोरमले, अनिल शिरतोडे, रामभाऊ मदने, अय्याज शेख, हरिष काकडे, संग्राम अहिवळे, लक्ष्मण काकडे, गणेश बिऱ्हाडे, रोहित विलास अहिवळे, दत्तात्रय मोहिते, पत्रकार प्रशांत अहिवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते, याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण'चे पदाधिकारी व नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments